धर्मवीर संभाजी महाराज
 
पुरंदर विषयी माहिती 
 
सभासद व्हा
 
संपर्क


संस्थापक अध्यक्ष
श्री प्रशांत पाटणे
मो. + ९१ ९६५७७ ७६७७७
मो. + ९१ ९८९०५ ७५८२७
बी/२ नानक निवास, २ रा मजला, सातारा रोड, एलोरा पॅलेस जवळ, बालाजी नगर, धनकवडी, पुणे.
 
 
धर्मवीर संभाजी महाराज जयंती उत्सव 14 मे 2012
 • जगातील पहिले बुलेट प्रुफ जॅकेट युध्द भुमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात तयार करणारा.
 • जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा
 • जंजिरा जिंकण्यासाठी उसळत्या सागरात आठशे मीटरचा सेतु बांधणारा
 • आदिलशाही, कुतुबशाही एकजुट करणारा आणि त्याचवेळी सिध्दी पोर्तुगीत व इंग्रजांना त्यांच्या बिळात कोंडून ठेवणारा
 • त्याच वेळी मोघलांचा कर्दनकाह ठरलेला
 • दुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून जल नियोजन करणारा.
 • उत्तर प्रदेशापासून दूर तामिळनाडू कर्नाटक आणि राजस्थान प्रांतातील लोकांनाही स्वराज्यासाठी एकत्र करणारा.
 • इतर धर्माचा मान सन्मान राखणारा आणि धर्मांतरावर कायदेशीर बंदी घालणारा.
 • बाल मजुरी व बेटबिगारी विरूध्द कायदा करणारा शिवप्रभुंची इच्छा पूर्ण करण्यासाठी राज्याभिषेक झाल्यावर पंधराव्या दिवशीच दूर मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर छापा घालणारा.
 • स्वराज्याला आर्थिक संपन्न ठेवणारा.
 • देहू ते पंढरपूर आषाढीवारीला संरक्षण व अर्थ पुरवठा करणारा.
 • दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना शेतीसाठी पीक कर्ज योजना राबविणारा.
 • सैनिकांच्या उत्पन्नाला इतर मार्गाने हातभार लागावा म्हणून चरईची सवलत कायम ठेवणारा.
 • आपले आरमार सुसज्ज करण्यासाठी परदेशातून तंत्रज्ञान व प्रशिक्षित लोकांचे सहकार्य घेणारा.
 • स्वत:चे आधुनिक बारूद खाने तयार करून स्वदेशीचा महामंत्र देणारा.

                                                          
  राजा शंभूराजा

       संभाजी महाराजांना बदनाम करण्यामागे संभाजी महाराजांनी चालविलेली सामाजिक सुधारणा जातीभेद निर्मुलन, गोर गरीबांची बाजू घेणे, दुसऱ्या धर्मात गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेणे, उत्तरेतून आलेल्या कवी कलशांना अष्ट प्रधान मंडळात सामिल करणे, येसुबाईंना कुलमुखतियार (प्रशासन प्रमुख) करणे, रायप्पा महाराचा भर दरबारात सन्मान करणे, शेतकऱ्यांना दुष्काळात शेतसारा माफ करणे व शिवाजी महाराजांची सर्व कल्याणकारी धोरण कडक स्वरूपात राबवित. त्यामुळेच जी सामाजिक परिवर्तनाची चळवळ सुरू झाली. त्यामुळे काही लोकांच्या वर्चस्वाला तर काही लोकांच्या हितसंबंधाला तर काहींच्या सामाजिक खोटया प्रतिष्ठेला तडाखा आणि त्यामुळेच पेटून उठलेल्या मुठभर लोकांनी संभाजी महाराजांची बदनामी केली असे प्रामाणिकपणे नमूद करावयास वाटते.

       शिवाजी महाराजांच्या नावाला काळीमा लागेल असे एकही कृत्य संभाजी राजांच्या हातून घडले तर नाहीच परंतु संभाजी राजांनी खुद आलमगीर औरंगजेबाबरोबर खेळलेली जंग अभूतपूर्व अशीच असून त्यातून त्यांचे खरे क्षात्रतेच तळपून निघाले. महाराष्ट्रातील काही वतनदारांनी व सामाजिक परिवर्तनाला विरोध असणाऱ्यांनी संभाजी महाराजांना जिवंतपणे मोघलांच्या तावडीत पकडून देऊन आपला हेतू साध्य करण्याचा प्रयोग केला. परंतु तो यशस्वी झाला नाही.

       उलट संभाजी राजांच्या बलिदानाने पेटून उठलेला महाराष्ट्र सलग सत्तावीस वर्ष औरंगजेबाच्या विरूध्द लढला व खुद्द औरंगजेबालाच या मातीत गाडून बदला घेऊनच येथील लोक थांबले. त्यामुळे मोघलांनी महाराष्ट्राचा कारभार करावा अशी मानसिकता असणाऱ्या व आपले उखळ पांढरे करू पाहणाऱ्या मुठभर परंतु बुध्दिमान वतनदारांनी संभाजी बदनाम केला. संभाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय होता यात शंकाच नाही. परंतु त्याचवेळी त्यांच्या चारित्र्यात कोठेही खोट नाही हे ही तेवढेच सत्य आहे आणि तसेही जो पाच पाच शत्रुशी अहोरात्र झुंजतो त्याला छाबुगिरी करायला वेळ कोठून मिळणार ? आणि संभाजी जर तसे असते तरी मराठयांनी त्यांचे नेतृत्व स्वीकार कसे केले असते ?

       शिवाय ते छत्रपती झाल्यावर कधीही स्वराज्यात बंडखोरी कोणत्याही कारणाने सैन्याने किंवा एखाद्या सरदाराने केलेली नाही आणि संभाजी राजे जिवंत असेपर्यंंत तिनशे साठ किल्ल्यांपैकी एकही किल्ला पडला नाही किंवा आरमारातील एकही जहाज बुडले नाही. हे एका बाजूला तर संभाजी महाराजांच्या नेृत्वात मराठी फौजा मध्यप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, बंगाल प्रांतापर्यंत मजला मारत होत्या. संभाजी महाराजांनी दोन वेळ केलेली दक्षिण दिग्वीजयी मोहिम तसेच पोर्तुगीजांचे पूर्ण पारिपत्य व सिध्दीची ठेचलेली नांगी व इंग्रजांना दाखवलेला हिसका तसेच मोघलांना सतत आठ वर्षे सळो की पळो करून सोडणारा बदफैली किंवा वाईट चारित्र्याचा कसा असू  शकतो. या सर्वांचा अभ्यास केल्यावर जो संभाजी आपल्या समोर येतो तो खरा संभाजी.

       सह्याद्रीच्या कडया कपारीत आणि उभ्या महाराष्ट्रभर रात्रीचा दिवस करून ज्याने संपूर्ण महाराष्ट्र मोघलांच्या तावडीतून शाबूत ठेवलाअशा पराक्रमी राजाचे विस्मरण होऊ शकेल एवढा महाराष्ट्र कृतघ्न होऊ शकणार नाही. छत्रपती शिवाजी राजांच्या प्रत्येक धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणारा हा राजपुत्र व्यसनी व बाईल वेडा असूच शकत नाही. याचे अनेक पुरावे उघड झाले आहेत. शिवाजी महाराजांच्या कालची परिस्थिती व संभाजी राजांच्या काळची परिस्थिती यात खूपच फरक होता. शिवाजी राजांच्या काळी महाराष्ट्रवर एखादा अफजल खान किंवा शाहीस्तेखान पन्नास साठ हजारांची फौज घेऊन महाराष्ट्रावर चालून यायचा परंतु संभाजी राजाच्या काळात औरंगजेब बादशहा स्वत: पाच लाख फौजेचा सेना सागर घेऊन महाराष्ट्रावर तुटून पडला असताना साठ सत्तर हजार फौजेनिशी तुटपुंज्या रसदीच्या बळावर व प्रतिकूल परिस्थिती असताना या वादळाचा सामना करणे हे अग्नीदिव्यच होते. शिवाय महाराष्ट्रात वतनदाराच्या फंदफीतरीला उधाण आलेले.

       अशा परिस्थितीत साथ देणारे विश्वासू होते ते फक्त सह्याद्रीचे निधडया छातीचे राखट, दणकट किल्ले आणि खिंडी. जुलै 1680 ते मार्च 1689 या आठ वर्षात उभ्या महाराष्ट्राने या कर्तुत्वान युवराजाचे कुशल नेतृत्व पहिले आणि डोळयाचे पारणे फिटले. हिंदवी स्वराज्य संभाजी राजांच्या हाती सुरक्षित राहू शकते हा शिवाजी राजांचा विश्वास खरा ठरला. नाहीतर एकाच वेळी मोगल, इंग्रज, पोर्तुगीज, सिध्दी, आदिलशहा या पाच शत्रूंच्या जबडयातून स्वराज्य सुरक्षित ठेवणे हे किती कठीण काम होते.

       परंतु संभाजी राजांच्या आठ वर्षाच्या कालावधीत स्वराज्याचा एकही किल्ला शत्रुच्या ताब्यात गेला नाही किंवा आरमारातील एकही जहाज बुडले नाही. यावरून संभाजी राजे राज्य करताना किती दक्ष होते व सतर्क होते याची साक्ष पटते. शिवाजी महाराजांनी केलेली दक्षिण स्वारी सगळयांनाच माहीत आहे, परंतु संभाजी राजांनी दोनदा दक्षिणेवर स्वारी करून तामिळनाडू, केरळ कर्नाटक, हे प्रदेश जिंकले हे ही आता आपण लक्षात ठेवावे. 

संदर्भ- खरा संभाजी लेखक: प्रा.नामदेवराव जाधव

       रयतेचा राजा- शंभुराजा अशा या वीर महापराक्रमी शंभू राजांचा जन्म पुरंदरच्या पावन भूमीत झाला.

       14 मे 1657 या दिवशी पुरंदरेश्वराच्या केदारेश्वराच्या कृपेने रूद्र जन्माला आला मराठी मनाचा मानबिंदू स्वराज्याचा वारस रयतेचा राजा स्वाभिमानी शंभूराजा जन्मला....

       स्वाभिमान दिन जयंती उत्सवाच्या निमित्ताने या स्वाभिमानी राजाला मानवंदना देण्यासाठी 14 मे हा दिवस दरवर्षी स्वाभिमान दिन म्हणून साजरा करूया. चला संभाजी महाराज जन्मस्थान पुरंदर किल्ल्यावर संभाजी महाराज जयंती साजरी करूया. जर आपणाला पुरंदरवर येता येत नसेल तर आपल्या गावात गल्लीत हा जयंती साजरी करा. आपल्या मुलांच्यात स्वाभिमानाची ज्योत जागवा. एक नवी आदर्श पिढी घडवा.

 
© 2016 Purandar Pratishthan Pune Website By Ar9 Design