धर्मवीर संभाजी महाराज
 
पुरंदर विषयी माहिती 
 
सभासद व्हा
 
संपर्क


संस्थापक अध्यक्ष
श्री प्रशांत पाटणे
मो. + ९१ ९६५७७ ७६७७७
मो. + ९१ ९८९०५ ७५८२७
बी/२ नानक निवास, २ रा मजला, सातारा रोड, एलोरा पॅलेस जवळ, बालाजी नगर, धनकवडी, पुणे.
 
 
पुरंदर प्रतिष्ठान
सर्वसामान्य नागरिक व समाजातले दुर्लक्षित घटक म्हणून स्वतःची आळेख करुन घेणारी मध्यवर्गीय  माणसं. का म्हणून आपण दुबळे, दुर्लक्षित आणि सर्वसामान्य आहोत, असं स्वतःला आपण कधी विचारले आहे  कां ? नाही ना ! आपली ओळख समाजाला व्हावी, समाजाने आपली दखल घ्यावी असे प्रत्येकाला वाटत असत. हो ना ! परंतु त्यासाठी आपल्या कला गुणांना वाव देणारं स्वतःचं हक्काचं व्यासपीठ मात्र आपल्याकडे असायला हवं. संघटना असेल तर प्रत्येकाचा आवाज समाजापर्यत पोहचवता येतो. प्रत्येकाच्या विचारांचा - कल्पनांना, कृतीची जोड मिळते आणि त्यातूनच निर्माण होईल आपले स्वतःचे अस्तित्व जे कधी ही कोणीही नष्ट करू शकणार नाही समाजात दुर्बलांना किंमत नसते. परंतु हेच दुर्बल घटक एकत्र आले. तर नक्कीच सबल समाज तयार होईल यात शंका नाही . मराठी समाज कधीच एकत्र येऊ शकत नाही. याला आपणच सर्वजण जबाबदार आहोत. परंतु आता कुठंतरी आपण बदलायला हवं. प्रत्येकानं आपला मान - समान,अस्मिता, यासाठी झगडायला हवं ! सगळीकडे बदलाचे वारे वाहत असताना आपण गप्प कां ?  श्री छत्रपती शिवरायांचे अनुयायी म्हणवून घेणारे आम्ही आज रक्त गोठलेल्या,निर्विचार पुतळयासारखे झालो आहोत. कधीतरी या शरिरावर रोमांच येऊन रक्तात सळसळ होऊ द्या. स्वतःचा स्वाभिमान जागा होउ द्या !

आपण एकत्र आलो तर आपल्या पुढच्या पिढीसाठी एक नवीन आदर्श घालुन देऊ,आपल्यातलेच,आपलेच बंधु - बांधव,मित्र जे अडचणीत आहोत. त्यांना मदतीचा हात देणं, त्यांना इथं खंबीरपणानं उभं राहण्यासाठी बळ देणं, ताकत देणं, आपलं काम नाही का ? आज परप्रांतातून अनेक जाती-धर्माचे लोक इथं आले. उद्योग व्यवसायात यशस्वी झाले आणि आज समाजात उच्चभ्रू स्थानावर जाऊन बसले. आपण मात्र स्थानिक भूमीपूत्र होतो. तिथंच आहोत. कारण असंघटीतपणा, अविश्वास, इतरांना दोश देत बसण्यापेक्षा आपण संघटित झालो, एकमेकांना मदत केली, हेवे- दावे सोडले तर बरच काही होऊ शकते. 

आज आपण बारकाईने विचार केला तर ‘मराठी माणूस’ फक्त  ' गिऱ्हाईक '  राहिलाय असं का ? का बनलो आपण फक्त  गिऱ्हाईक ? याचा विचार करायला वेळ कुठं आहे. आपल्याकडे ? पण आता वेळ काढा ! काय कमी आहे. आपल्यात याचा शोध घ्यायला हवा. आपल्या येणाऱ्या  पुढच्या पिढयांचा विचार करायला हवा. मराठी व्यावसायिकता वाढली आहे. त्यात आपण भर घालायला हवी. ज्यांच्यात व्यवसाय करायची उर्मी आहे, नव्हे ही काळाची गरज आहे. त्यांच्यामागे खंबीरपणे उभं राहायला हवं. क्रांतीचा मार्ग पोटाकडून मेंदुकडे जातो असं म्हणतात. म्हणून प्रत्येकाने आर्थिक स्थैर्य मिळवायला हवं, आर्थिक स्थैर्य मिळवायला हवं, आर्थिक परिस्थिती सुधारली की सर्वत्र सूबत्ता नांदेल. पुढच्यांना हात देऊन वर घेता येईल. म्हणून आपण संघटित व्हायला हवं

मराठा तितका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा ।। या उक्तीने प्रेरित होऊन महाराजांनी स्वराज्य घडवलं, परंतु महाराज नसते तर आजचा समाज ‘समाज ’ राहिला नसता. महाराजांइतकेच किंबहुना त्यांच्यापेक्षा काकणभर जास्त शौर्यने आणि पराक्रमाने शंभूराजांनी सातत्याने मोघलांशी झुंजून स्वराज्य आबाद केले. परंतु या रुद्र अवतारी शंभूराजांच्या नशीबी उपेक्षाच आली. राजांची निंदा नालस्ती करुन बैदफैली ठरवून इतिहासाने त्यांना काळीमा  फासला परंतु सत्य सुर्यप्रकाशाइतकेच तेजस्वी, पराक्रमी, स्वाभिमानी,धर्मवीर, रयतेची माऊलीप्रमाणे काळजी घेणारे, धुरंदर, दूरदृष्टी असलेले बुलंद व्यक्तिमत्व इतिहासात शंभूराजांपूर्वीही नव्हते व नंतरही घडणार नाही, अशा या ‘रयतेच्या राजाचा’ ‘जाणत्या राजाचा’ जन्म ज्या पुरंदरवर झाला ती भूमी मी माती पवित्र न म्हणावी तर नवलच. अशाच मातीत जन्मलेले तुम्ही आम्ही आहोत म्हणूनच शंभूराजांचे ऋण या जन्मात तरी फिटणे अशक्य आहे हे ध्यानात ठेऊनच आपण या थोर पुरुषांची जयंती त्यांच्या जन्मभूमीत जाऊन म्हणजेच ‘पूरंदर’ वर 14 मे  रोजी  साजरा केलीच पाहीजे.  या करीता  आपण मरती  आहोत. आपला जन्म या वीरांच्या भूमीत झालेला आहे, राष्ट्रमाता आदरणीय जिजाऊ  आईसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज  व छत्रपती संभाजी महाराज यांचे, त्यांनी उभारलेल्या स्वराज्याचे स्मरण ठेवून आपल्या गोठलेल्या निर्विकार रक्ताला जागे करून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाला, प्रत्येक व्यक्तीला प्रेरित करण्याची जबाबदारी हि प्रत्येक संस्थेने स्वयंप्रेरणेने उचलावी ओ या कार्यामध्ये सहभागी होणेसाठी कोणतेही राजकारण नकरता उमाद्या मनाने सहभागी व्हावे. हीच राष्ट्रमाता आदरणीय जिजाऊ आईसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज  व छत्रपती संभाजी महाराज यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल .म्हणूनच शिव-शंभू प्रेमींना हे कळकळीने आवाहन करीत आहोत. या एकत्र या . सहभागी व्हा, एकत्र लढूया अस्मितेसाठी खचलेल्या मराठी माणसांसाठी  व्यावसायिकतेसाठी !............. पुरंदर प्रतिष्ठानमध्ये सहभागी व्हा.

याकरिताच पुणे शहरामध्ये राहणाऱ्या युवकांचे आणि व्यावसायिकांचे संघटन करून एक वेगळा आदर्श  घडवू पाहत आहोत. याच्यातूनच सर्वांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यासाठी आपले सहकार्य अपेक्षित आहे. या कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रतिष्ठानची विनामुल्य सभासद नोंदणी सुरु आहे. आपण स्वतः सहभागी व्हाच, सोबत आपले मित्र, नातेवाईक, स्नेही, आप्तेष्ट यांनाही या कार्यामध्ये सहभागी करून घ्या. त्याची संपूर्ण माहिती व पत्ता आम्हास देऊन या सुराज्याच्या कामासाठी सहकार्य करा.
 
© 2016 Purandar Pratishthan Pune Website By Ar9 Design