धर्मवीर संभाजी महाराज
 
पुरंदर विषयी माहिती 
 
सभासद व्हा
 
संपर्क


संस्थापक अध्यक्ष
श्री प्रशांत पाटणे
मो. + ९१ ९६५७७ ७६७७७
मो. + ९१ ९८९०५ ७५८२७
बी/२ नानक निवास, २ रा मजला, सातारा रोड, एलोरा पॅलेस जवळ, बालाजी नगर, धनकवडी, पुणे.
 
 
पुरंदर तालुक्याजवळील पर्यटन स्थळे

किल्ले पुरंदर : अभेद्य खडकांवरचा, समुद्रसपाटीपासून 1398 मी. उंचीवरचा चौदाव्या शतकातील हा किल्ला बालेकिल्ला आणि माची अशा दोन भागात आहे. गडावरील दिल्ली दरवाजा, तटबंदी, केदारेश्वराचे मंदिर पाहण्यासारखे आहे. मुरारबाजीच्या शौर्याने पावन झालेली इथली माती वंदनीय आहे. स्वातंत्र्यानंतर इथे भारतीय सैन्याचे प्रशिक्षण केंद्र कार्यरत होते. छत्रपती संभाजी राजांचे तसेच सवाई माधवरावांचे हे जन्मस्थान.

सासवड
       सासवडला जाण्यासाठी भोरहून राष्ट्रीय महामार्गाने कापूरव्होळला जावे लागते. बालाजी, नारायणपूर मार्गे सासवडला जाता येते. हे अंतर सुमारे 40 कि.मी. आहे. सासवडला जाण्यासाठी सुमारे एक तास लागतो. पुण्याहून हडपसर मार्गे दिवेघाटातून, सासवडला जाता येते.

सासवड जवळील प्रेक्षणीय स्थळे

 1. पुरंदर- वज्रगड किल्ला     
 2. बालाजीचे मंदिर       
 3. नारायणपूरचे मंदिर            
 4. नारायणपूर समोरचा सूर्य पर्वत  
 5. कऱ्हा नदी व नदीकाठचे संगमेश्वर मंदिर  
 6. वटेश्वर मंदिर
 7. वीर बाजी पासलकर (कन्हैया चौकी) यांची समाधी
 8. बालाजी विश्वनाथ यांची समाधी 
 9. आबासहोब पुरंदरे वाडा, उंच तटबंदी
 10. भैरवनाथ मंदिर 
 11. सोपानकाकाची समाधी
 12. सोनेरी जवळचा पानसे यांचा मल्हारगड
 13. सासवडजवळ असणारे जेजुरीचे देवस्थान.
 14. भुलेश्वर मंदिर

दिवे घाट : पंढरपूरच्या वारीतील पुण्याची सरहद्द ओलांडताना हा दिवेघाट भेटीला येतो. या घाटात वारकऱ्यांची श्रमपरीक्षा होते.अत्यंत अवघड वळणाचा हा दिवे घाट निसर्गाच्या वरदानाने मात्र अतिशय समृध्द आहे. याच्याच परिसरात चिंकारा हरिणासारखे वन्यप्राणी तसेच आशिया खंडातील दुर्मिळ फुलपाखरे पाहायला मिळतात.

संगमेश्वर : संतश्रेष्ठ सोपानदेव, संत चांगदेव, श्रीदत्त महाराज, बाळाजी विश्वनाथ पेशवे, होळकर, पुरंदरे, पानसरे यांच्या कर्तृृत्वाने नटलेली आणि आचार्य प्र.के.अत्रेंच्या लेखणीने समृध्द झालेली सासवडची भूमी सुजलाम करण्याचे कार्य ही कऱ्हा नदी करते. सासवड गावी नदीकिनारी भव्य संगमेश्वर मंदिर असून सध्या ते आचार्य अत्रे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मोठे सांस्कृतिक केंद्र बनले आहे. येथेच जवळ बाळाजी विश्वनाथ यांची समाधी आहे.

सोन्याची जेजुरी : खंडोबाची जेजुरी हे महाराष्ट्रातील जागृत देवस्थान.
       म्हाळसाकांत किंवा मल्हारी मार्तंड यांचे हे देवालय छोट्या टेकडीवर आहे. देवळाला 450 पायऱ्या आहेत. दसऱ्याला खंडोबाची तलवार उचलण्याचा विधी तसेच सोमवती अमावस्येची जत्रा प्रसिध्द आहे. जेजुरीच्या गडावरच छत्रपती शिवाजी व शहाजीराजांची महत्त्वपूर्ण भेट झाली होती. ज्यामध्ये मोगलांविरुध्द लढण्यासाठीची प्रेरणा छत्रपतींना वडिलांकडून मिळाली.

मल्हारगड : पेशव्यांचे पराक्रमी सेनापती सरदार पानसेंचा सोनेरी गावातील हा गढीवजा राजवाडा थेट पुण्यातील शनिवार वाड्यासारखा दिसतो. संपूर्ण काळ्या दगडाचे बांधकाम, आतमध्ये लक्ष्मीनारायणाचे भव्य मंदिर आहे. तसेच इतरही मंदिरे पाहण्यासारखी आहेत. तटबंदीवरुन सुंदर परिसर न्याहाळता येतो.

श्रीक्षेत्र नारायणपूर : दत्ताचे हे जागृत देवस्थान. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले हे गाव संत चांगदेवाचे गाव म्हणूनही ओळखले जाते. दत्तमंदिराबरोबरच नारायणेश्वराचे पांडवकालीन जुने देऊळ, त्यांचे बांधकाम, शेजारचा प्राचीन औदुंबर वृक्ष, हेमाडपंथी बांधकाम तसेच भोवतालचा पुरंदरचा निसर्गप्रेमींना व अभ्यासूंना आकर्षित करतो. (मंदिरातील महाराजांच्या पुढाकाराने चाललेले व्यसनमुक्तीचे कार्यही लक्षवेधी.)

बालाजी मंदिर : पुण्यापासून 40 कि.मी. अंतरावरील केतकावळे या गावी जगातील सर्वात मोठी (तिरुपती येथील) बालाजी मंदिराची प्रतिकृती वेेंकटेश्वरा उद्योगसमूहाने उभारली आहे. 10 एकरांवरील या मंदिराचे बांधकाम सुमारे 4000 स्क्वेअर फूट असून बालाजीचा दर्शन मंडप विशाल आहे. देशाचे कृषिमंत्री ना. शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते मंदिराचे उद्‌घाटन झाले असून परिसरात निवासाचीही व्यवस्था आहे. मंदिरासाठी सुमारे 14 कोटी रुपये खर्च आल्याचे सांगितले जाते.

क्रांतीवीर उमाजी नाईक : ब्रिटिशांविरुध्द लढा पुकारणारे आद्य क्रांतीकारक.
       सन 1826 पासून रामोशी समाजातील शूरविरांना हाताशी धरुन नरवीर उमाजी नाईकांनी ब्रिटीशांना सळो की पळो करुन सोडले. त्याचबरोबर राज्यातील इतरही भागात क्रांतीची ज्वाला प्रज्वलीत केली. पुरंदरच्या भूमीतील या नरवीराला पुण्यातील खडकमाळ येथे ब्रिटीशांनी 1832 मध्ये  आशी दिली. त्यांच्या जन्मगावाजवळ (भिवंडी येथे) स्मारक उभारण्यात आले आहे.

श्रीमंत बाळाजी विश्वनाथ : मूळचे चिपळूण श्री. बाळाजी भट सन 1699 ते 1703 या काळात परगण्याची सरसुभेदारी सांभाळीत होते. त्यानंतर सन 1713 मध्ये ते पेशवे झाले. प्रचंड पराक्रमी असा हा योध्दा वयाच्या 60 व्या वर्षी 2 एप्रिल 1720 मध्ये स्वर्गवासी झाला. यांचे सासवड येथील संगमेश्वर मंदिराजवळ स्मारक अवश्य पाहण्यासारखे आहे.

मोरगावचा गणपती : बारामती तालुक्यात अष्टविनायकातील एक गणपती आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरुन यवत-चौफुला-सुपा-मोरगाव असे जाता येते. दुसरा मार्ग पुणे-सासवड-जेजुरी-मोरगाव असाही आहे. पुण्यापासून हे ठिकाण 64 कि.मी.अंतरावर आहे.

पुरंदर तालुक्याजवळील पर्यटन स्थळे व अंतर :
1)    भोर सासवड 45 कि.मी
2)    कापूरव्होळ सासवड 25 कि.मी
3)    सासवड हडपसर 22 कि.मी.

सासवड गावामधील पर्यटन स्थळे :
1)    संगमेश्वर मंदिर
2)    बाजी पासलकर- बाळाजी विश्वनाथ समाधी
3)    पुरंदरे वाडा
4)    संत सोपानकाका समाधी स्थान
5)    चांगवटेश्वर मंदिर 1 कि.मी.

 
© 2016 Purandar Pratishthan Pune Website By Ar9 Design