धर्मवीर संभाजी महाराज
 
पुरंदर विषयी माहिती 
 
सभासद व्हा
 
संपर्क


संस्थापक अध्यक्ष
श्री प्रशांत पाटणे
मो. + ९१ ९६५७७ ७६७७७
मो. + ९१ ९८९०५ ७५८२७
बी/२ नानक निवास, २ रा मजला, सातारा रोड, एलोरा पॅलेस जवळ, बालाजी नगर, धनकवडी, पुणे.
 
 
ध्येय आणि उद्दिष्टे
 • पुरंदर प्रतिष्ठानच्या माध्यमातून पूणे शहर व परंदर मधील सर्व थरातील, समाजातील कुटूंबाना , युवकांना , व्यावसायिकांना , महिलांना , एकाच व्यासपीठावर एकत्र आणणे
 • सर्व तरूण युवकांनी एकत्रित येउन आपल्यातीलच दुर्बलांना आर्थिक, सामाजिक, मानसिक पातळीवर सबल करणेसाठी प्रयत्न करणे.
 • प्रतिष्ठानच्या माध्यमातून मराठा वधू-वर सूचक केंद्र व अन्य सर्वजातीय वधू - वर सूचक केंद्र मोफत किंवा अत्यल्प फी मध्ये चालवणे व सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ‘सामुदायिक विवाह’सोहळयाच्या माध्यमातून ती जोपासण्याचा प्रयत्न करणे.
 • प्रतिष्ठानची स्वतःची अदयायावत ‘ब्लड बॅक ’ निर्माण करणे व रक्तदानाच्या माध्यमातून कोणालाही व कोठेही मोफत रक्त उपलब्ध करुन देणे.
 • आपल्यातीलच गोरगरिब किंवा कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तिला गंभीर आजारामध्ये किंवा अपघातात जखमी झालेल्यांना यथाशक्ती पैशाच्या स्वरुपात प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदत करणे व अन्य संस्थाकडून मदत मिळवून देणे.
 • प्रतिष्ठानच्या माध्यमातून हूषार आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या विद्याथ्र्यासाठी ‘शैक्षणिक शिष्यवृत्ती’ देउन शिक्षण पूर्ण करणेसाठी मदत करणे 10 वी 12 वी नतरचे मार्गदर्शन व्याख्यान, करिअरच्या वाटा,पुढे काय ?
 • शिक्षणासाठी पुढयात येणारय विद्याथ्र्यांसाठी राहण्याची गैरसोय होउ नये म्हणून प्रतिष्ठानचे अद्ययावत होस्टेल काढण्यासाठी प्रयत्नवत राहणे.
 • दरवर्षी धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती त्याच्या जन्मभूमीत म्हणजेच ‘पुरंदर ’ वर साजरी करण्यासाठी सर्व सभासदांनी योगदान देउन ‘स्वाभिमान सप्ताह ’ साजरा करणे
 • समाजातील मान्यवर, लोकहितासाठी झटणारे, विविध थरातील, विविध विषयात कार्यरत असणारे, आपल्या कर्तुत्वाने वेगळा ठसा उमटविणारे विविध क्षेत्रातील  कला,क्रिडा, आरोग्य ,शिक्षण, महिला विकास, पर्यावरण, समाजकारण    कर्तृत्वान  व्यक्तिचां गुणगौरव सोहळा व सत्कार समारंभ आयोजित करुन  त्यांना पुरस्कार    प्रदान करणे देउन गौरविणे.
 • दरवर्षी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शरिरसौष्ठत्व, कुस्ती स्पर्धा,मैदानी खेळ यासारख्या स्पर्धामधून गुणवंत खेळांडू निर्माण करण्यासाठी ‘किडा प्रबोधनी’ ची स्थापना करणे.
 • कलेच्या क्षेत्रात काम करणारयांना कला, संस्कृती, सामाजिक संस्कार जोपासण्यासाठी प्रोत्साहन देणे व ‘ कला अॅकॅडमी ’ निर्माण करुन त्याद्वारे प्रशिक्षित करणे.
 • समाजिक बांधिलकी जपण्यासाठी व सातत्याने वाढता ‘ग्लोबल वाॅर्मिंग ’ वर मात करण्यासाठी जमिनीची धूप थांबवून, पाणलोट विकास व्हावा दरवर्षी वेगवेगळया भागात ‘वृक्षारोपण ’ करणे ते वृक्ष वाढविण्यासाठी दत्तक योजना राबवणे तसेच गरजू शेतकरयांना मोफत फळझाडांचे वाटप करुन फळबागेस प्रोत्साहण देणे.
 • शेतकरी बंधूसाठी शेतीविषयक व्याख्याने,पुस्तके,कर्जयोजना,पिकांचे मार्केटींग, शेती आधुनिकीकरणासाठी प्रयत्न करणे, जलसिंचन योजना राबवून उत्कृष्ट शेती करणारयांना पुरस्काराने गौरवणे.
 • स्वयंरोजगार,लघुउद्योजक, व्यावसायिक यांना मार्गदर्शनपर व्याख्याने व मेळावे आयोजित करुन त्यांना आर्थिक सहाया मिळवून देणे व बेरोजगारी कमी करण्यासाठी इतर संस्थांची मदत घेउन सहकार्य करणे.
 • पुणेजिल्हयातील सर्व गडकिल्यांचा विकास व्हावा. आपल्या मौल्यवान ऐतिहासिक वारसा जपावा यासाठी सर्व दुर्ग सुधार योजना राबवणे व पुरंदर किल्यावर सर्व सोयी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे. 
 • आपल्या मुलांना निर्सगाची गोडी निमाण व्हावी, गड किल्यांची माहीती व्हावी, इतिहासाची माहीती व्हावी, यासाठी सहयाद्रिच्या कडे कपारीतून हिंडून ‘ट्रेक सहयाद्रिच्या सर्व गडकिल्यांचा हि सहल आयोजित करुन दरवर्षी सभासदांच्या मुलांना अत्यल्प शुल्क घेउन जाणे.
 • महिलां साठी विशेष करुन वचत गट निर्माण करुन त्याद्वारे व्यवसायिकिता वाढवण्यासाठी मदत करणे, व महिला आरोग्य समाज कल्याण, व्यवसायाच्या वाटा इ. विषयावर खास महिलां साठी व्यख्याने आयोजित करणे.
 • वृध्द व ज्येष्ठ नागरीकासाठी त्यांना भेडसावनारे प्रश्न , त्याचे आरोग्य , त्याचे मानसिक आरोग्य इ. विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्याने , धार्मिक स्थळांना भेट - सहल , मोफत  औषधो उपचार , वैद्यकीय सेवा पूरवण्यासाठी प्रयत्न करणे. 
 • या सर्व ध्येय - उद्दिष्टांची पुर्तता करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे व आपले सभासत्व आजच नोंदवून घ्यावे. शुभूरांजावर प्रेम व शिवांजी महाराजांचा व महाराष्टाचा अभिमान असणाऱ्यासाठीच व सामाजिक कार्यची जान असणाऱ्यांसाठी हे प्रतिष्ठान आहे. हे ध्यानात ठेवावे.

जागे व्हा । जरा विचार करा ।।
आपण आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी ज्याप्रमाणे धनसंचय करतो, त्यांच्यासाठी वास्तुबांधतो, त्याप्रमाणे आपण सर्वांवर वेळ आली आहे - आॅक्सिजन वायुचा संचय करण्याची . जर आपल्या मुलांना व पुढच्या पिढींना श्वासोच्छवास घ्याला आॅक्सिजन वायु उपलब्ध नसेल, तर याधन संचयाचा आणि वास्तूचा उपयोग काय ? आपल्या मुलांना व पुढच्या पिढींना शुध्द हवा श्वासोच्छवास  हवा असेल तर आजच आपण प्रत्येक एक तरी वृक्ष लावून वातावरणा मध्ये आॅक्सिजन वायुची निर्मिती केली पाहीजे हे नम्र आवाहन । 
 
© 2016 Purandar Pratishthan Pune Website By Ar9 Design