संस्थापक अध्यक्ष
श्री प्रशांत पाटणे
मो. + ९१ ९६५७७ ७६७७७
पुरंदर प्रतिष्ठान
सर्वसामान्य नागरिक व समाजातले दुर्लक्षित घटक म्हणून स्वतःची आळेख करुन घेणारी मध्यवर्गीय  माणसं. का म्हणून आपण दुबळे, दुर्लक्षित आणि सर्वसामान्य आहोत, असं स्वतःला आपण कधी विचारले आहे  कां ? नाही ना ! आपली ओळख समाजाला व्हावी, समाजाने आपली दखल घ्यावी असे प्रत्येकाला वाटत असत. हो ना ! परंतु त्यासाठी आपल्या कला गुणांना वाव देणारं स्वतःचं हक्काचं व्यासपीठ मात्र आपल्याकडे असायला हवं. संघटना असेल तर प्रत्येकाचा आवाज समाजापर्यत पोहचवता येतो. प्रत्येकाच्या विचारांचा - कल्पनांना, कृतीची जोड मिळते आणि त्यातूनच निर्माण होईल आपले स्वतःचे अस्तित्व जे कधी ही कोणीही नष्ट करू शकणार नाही समाजात दुर्बलांना किंमत नसते. परंतु हेच दुर्बल घटक एकत्र आले. तर नक्कीच सबल समाज तयार होईल यात शंका नाही . मराठी समाज कधीच एकत्र येऊ शकत नाही. याला आपणच सर्वजण जबाबदार आहोत. परंतु आता कुठंतरी आपण बदलायला हवं. प्रत्येकानं आपला मान - समान,अस्मिता, यासाठी झगडायला हवं ! सगळीकडे बदलाचे वारे वाहत असताना आपण गप्प कां?  श्री छत्रपती शिवरायांचे अनुयायी म्हणवून घेणारे आम्ही आज रक्त गोठलेल्या,निर्विचार पुतळयासारखे झालो आहोत. कधीतरी या शरिरावर रोमांच येऊन रक्तात सळसळ होऊ द्या. स्वतःचा स्वाभिमान जागा होउ द्या!

संयुक्त विद्यमाने
राजगड ग्रुप, राजमुद्रा ग्रुप, शंभूराजे प्रतिष्ठान, शिवराय प्रतिष्ठान, जय अंबे प्रतिष्ठान, रायरेश्वर प्रतिष्ठान, जाणता राजा प्रतिष्ठान, शिव फौंडेशन , सासवड, बालाजीनगर व्यापारी असो, गनिमी कावा संघटना, परिंचे गाव पुणे शहर मंच, बहुजन हक्क परीषद, सासवड
 
सभासद व्हा
 
 
© 2016 Purandar Pratishthan Pune Website By Ar9 Design